TOKYO Olympic नवजोत कौरचा धमाका; भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात, स्पर्धेत आव्हान कायम

Tokyo Olympics 2020 :  नवजोत कौरने केलेल्या गोलच्या जीवावर भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान अद्याप कायम राहिलं आहे. 

भारत-आयर्लंड महिला हॉकीचा आजचा सामना हा भारतीय महिला संघासाठी 'करो या मरो' स्थितीचा होता. त्यामुळे आजचा सामना जिंकायचाच या इराद्याने प्रत्येक खेळाडू मैदानात उतरल्याचं दिसून आलं. खेळ रंगात आला असताना 57 व्या मिनिटाला नवजोत कौरने एका पासवर अप्रतिमरित्या चेंडू जाळ्यात ढकलला आणि भारताने शेवटच्या क्षणी 1-0 अशी आघाडी घेतली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola