TOKYO Olympics : बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाईन उपांत्य फेरीत, ऑलिम्पिकमध्ये भारताचं दुसरं पदक निश्चित
संदीप चव्हाण
Updated at:
30 Jul 2021 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTokyo Olympics 2020 LIVE : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चीनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.