IND vs BAN, Match Highlights : टीम इंडियाची बांगलादेशवर सनसनाटी मात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIND vs BANG, Match Highlights : टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामना कमालीचा रोमहर्षक झाला. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे. त्यामुळे अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला. आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला. पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला.