Hardik Pandya : कुंग फू पांड्या टी20 संघाचा कर्णधार, कॅप्टन्सीचं शिवधनुष्य पांड्या पेलणार का?
शशांक पाटील
Updated at:
18 Nov 2022 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) पार पडला, सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुनही सेमीफायनलमध्ये (IND vs ENG) इंग्लंडकडून दारुण पराभूत झाल्यामुळं भारत स्पर्धेबाहेर झाला. ज्यानंतर सर्वच भारतीय कमालीचे निराश झाले. असो खेळ म्हटल्यावर हार जीत होणारच पण पराभवातून काहीतरी शिकलं तरच भविष्यात फायदा होणार हे नक्की... त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकपसाठी भात काय बदल करणार हेपण तितकच महत्त्वाचं आहे. त्यात अनेकांकडून युवांना संधी द्यायला हवी आणि नेतृत्त्वही बदलायला हवं अशी मागणी होत असताना भारताचा स्टँड इन कॅप्टन हार्दिक (Hardik Pandya) योग्य पर्याय आहे का? याबद्दल जाणून घेऊ...