T20 विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर BCCIचा मोठा निर्णय, निवड समितीचे सर्व सदस्य बरखास्त
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले होते. इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर बीसीसीयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पाचही जागांसाठी अर्ज मागवले आहेत. चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांना बरखास्त करण्यात आले आहे. दरम्यान, निवड समितीच्या नवीन जागा भरेपर्यंत चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच काम पाहणार आहे.
Continues below advertisement