Indian Team Players Match Fee : बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष-महिलांना समान मानधन

BCCI Announcement : भारतीय महिला क्रिकेटर्सनी (Indian Womens Cricket Team) नुकतच आशिया कप 2022 वर नाव कोरलं. मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल सुधारणेनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबाही दिसून येत आहे. ज्यानंतर आता बीसीसीआयनंही एक मोठं पाऊल उचलत पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola