India Vs Netherlands T20 : टीम इंडियाचा दुसरा विजय, पाकिस्तानपाठोपाठ भारतानं नेदरलॅंड्सलाही हरवलं

India Vs Netherlands T20 : रोहित शर्माच्या टीम इंडियानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात लागोपाठ दुसरा विजय साजरा केला. भारतानं सिडनीतल्या सामन्यात नेदरलँड्सचा 56 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं नेदरलँड्सला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासोर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात नेदरलँड्सला अपयश आलं. भारतीय गोलंदाजांनी नेदरलँड्सला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांत रोखलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola