ABP News

Birmingham 2022 Commonwealth Games : भारतीय कुस्तीपटूंचा षटकार,साक्षी मलिकची सुवर्ण कामगिरी

Continues below advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत पदकांचा षटकार मारलाय. कुस्तीपटू दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकनं सुवर्ण कामगिरी केलीये. यासह अंशू मलिकनं रौप्यपदकाची तर दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवालने कांस्यपदकाची कमाई केलीये. त्यामुळे भारताच्या खात्यातील पदकांची संख्या २६वर पोहोचलीये. 86 किलोग्राम वजनी गटात  दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला चितपट करत सुवर्ण कामगिरी केली. तर,  फ्री स्टाईल 62 किलोग्राम वजनी गटात साक्षी मलिकनं कॅनडाच्या अॅना गोंझालेजला नमवलं. यासोबतच ६५ किलो वजनीगटात बजरंग पुनियानं सुवर्ण कामगिरी केलीये. 57 किलो वजनी गटात अंशू मलिकचं सुवर्ण थोडक्यात हुकलं असून तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर, ६८ किलोग्राम वजनी गटातील रोमहर्षक सामन्यात दिव्या काकरनला कांस्यपदकं मिळालंय. यासोबतच 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालला कांस्यपदक मिळालंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram