Weightlifting सर्वाधिक पदकं, भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी भारताच्या खात्यात आतापर्यंत 18 पदकं
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या गणेश माळी, चंद्रकांत माळी आणि ओमकार ओतारी या तिन्ही वेटलिफ्टर्सनी भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली. या तिन्ही मराठमोळ्या वेटलिफ्टर्सचा समान दुवा म्हणजे, कोल्हापुरातलं कुरुंदवाड हे गाव. ते तिघंही कुरुंदवाडच्या प्रदीप पाटील यांच्या तालमीत तयार झाले आहेत.