पिंपरी : शिवाजी कोण होता? पुस्तक वाटपावरुन बजरंग दलाची मारहाण, संभाजी ब्रिगेडच्या पोखरकरांचा आरोप
Continues below advertisement
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शरद पोखरकर यांनी केला आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमध्ये हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोखरकर हे मराठा क्रांती मोर्चा आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानशीही संबंधीत आहेत. जिजाऊ प्रतिष्ठानशी निगडीत एका कार्यक्रमादरम्यान गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता, या पुस्तकाचं वाटप सुरु होतं. त्यावेळी हे पुस्तक का वाटतो आहेस, असा प्रश्न विचारत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पोखरकर यांनी केलाय. मंचर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement