Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक

Continues below advertisement

Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक

टीम इंडिया जल्लोष

17 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर आज टीम इंडिया मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झाली. चार तासांपासून टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखो तरुण-तरुणाई एकवटले. लाखोंचा जनसागर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळाला. टीम इंडिया मरीन ड्राईव्ह वरून वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचे स्वागत

Team India Victory Parade LIVE: टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वात इंडियाने रेकॉर्ड केलाय. 17 वर्षानंतर भारताने चषक जिंकला. मुंबईकर मोठ्या उत्साहाने टीमचे स्वागत करत आहेत. नागरिकांना विनंती आहे की गर्दी मोठी आहे, उत्साह देखील आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी. प्रशासन आणि पोलिसांनी व्यवस्था केली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram