Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी राष्ट्रपती Ashraf Ghani जबाबदार : Joe Biden

Continues below advertisement

अफगाणिस्तानच्या जनतेचा गुन्हेगार कोण?  अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन? या प्रश्नावर जगभरात खल सुरु असताना, जो बायडेन यांनी अफगाणिस्तानवर ओढवलेल्या संकटाचं खापर अशरफ गनींच्या डोक्यावर फोडलंय. अफगाणिस्तानात तालिबान्यांमुळं ओढवलेल्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयावर आपण अजूनही ठाम असल्याचं बायडेन यांनी म्हटलंय. शिवाय, अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावल्यानंतर तालिबाननं ज्याप्रकारे पुन्हा ताबा मिळवला, त्याला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी जबाबदार असल्याचं बायडेन म्हणालेत. दरम्यान अफगाणिस्तानाबाबत  अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेवर ब्रिटनसह अनेक देशांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र अशरफ गनी यांनी आपल्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं रहायला हवं होतं. पण ते न लढताच रणांगण सोडून पळून गेले. पण अमेरिकेने हिंमत सोडलेली नाही. दहशतवादाविरोधात आमची लढाई सुरूच राहील, असं बायडन यांनी सांगितलं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram