Bomb Blast in Lahore : मोस्ट वॉटेंड दहशतवादी हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर स्फोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2021 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. घटनेच्या ठिकाणी पोलीस, रेस्क्यु टीम आणि बॉम्ब विरोधी पथक पोहचलं आहे. हाफिज सईद हा पाकिस्तानच्या जौहर टाऊन या भागात राहत असून त्याच्या घरासमोर झालेल्या या स्फोटामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येतंय की या स्फोटाचा धमाका जबरदस्त होता. यामध्ये एक इमारत कोसळली असून आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्या त्या ठिकाणच्या गाड्यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.