Afghanistan Crisis : तालिबान्यांकडून अफगाण वैभव ओरबाडायला सुरुवात

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान्यांचा उन्माद काबूलच्या चौकाचौकात दिसून येतो. काबुल ताब्यात आल्यानंतर तालिबानी अक्षरशः वारा प्यायलेल्या बैलासारखे उधळले आहेत. काबूल शहरता जिकडे दिसेल तिथे त्यांचा धुमाकूळ सुरू आहे. अफगाणिस्तानचे अनेक राजकीय नेते तालिबान्यांच्या भीतीनं देश सोडून पळून गेले आहेत. अनेक नागरिकांनी भीतीनं आपली घरं सोडली आहेत. त्यांच्या घरावर आता तालिबान्यांचं राज्य आहे. आणि तिथलं वैभव त्यांनी ओरबाडायला सुरवात केली आहे. कुठे विक्षिप्त नाच, कुठे ट्रॅम्पोलिनवर माकडउड्या, कुठे डॅश कारची मारामारी... लहान मुलांच्या खेळण्यांनाही या तालिबान्यांना सोडलं नाहीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola