Minister Vishwajeet Kadam | कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय', मंत्री विश्वजित कदमांची कबुली
सांगली : एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय. खरं तर ही आमची मोठी चूक आहे आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी प्रांजळ कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर विश्वजित कदम बोलत होते.