WARDHA Teddy Bear Monkey : आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाचा 'टेडी बिअर' करतंय सांभाळ!
अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाला एका टेडी बीयरने सांभाळलेय. टेडी बियरला आपली आई समजत हे पंधरा दिवसांचे पिल्लू आता दोन महिन्याचे झालेय. माकडाच्या पिल्लाच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसाच्या पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान वर्ध्यातील प्राणी मित्रांपुढे होते. पिल्लाला सांभाळण्यासाठी वापरण्यात आलेली टेडीबियरची शक्कल लढवत वर्ध्याच्या करुणा श्रमातील प्राणी मित्र देखील कसोटीला खरे उतरलेय... चला तर मग पाहुया आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाच्या आईची भूमिका एका टेडी बियरने कशी वठविलीय....