Kisan Sabha Morcha | किसान सभा मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद, आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Maharashtra Mumbai Farmers Protest) समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तिथून मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो सिनेमा चौकात अडवला गेला. त्यानंतर राज्यपाल मुंबईत नसल्याची माहिती मोर्चेकऱ्यांना मिळाली. राज्यपाल स्वत: वेळ देऊनही उपस्थित नसल्याने संयुक्त मोर्चा चांगलाच आक्रमक झाला. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.
Tags :
Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Vishwas Nangre Patil Farmer Agitation Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Farmers Protest Mumbai