Thane Fire : ओरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग, 10 ते 12 वाहने जळून खाक

Thane Fire : ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ (Cine Wonder Mall) असलेल्या ओरियन बिझनेस पार्क (Orion Business Park) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आग जास्त भडकल्यानं शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंआहे. दरम्यान, या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola