Superfast News : भारत-पाक युद्धाच्या बातम्या, सुपरफास्ट एका क्लिकवर 13 May 2025

Superfast News : भारत-पाक युद्धाच्या बातम्या, सुपरफास्ट एका क्लिकवर 13 May 2025

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तीन दिवसांनी भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिल्याने देशभरात संतापाची लाट पसरली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेच्या मध्यस्थीचं कारण काय, अमेरिकेनं दबाव टाकला का, असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना, अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाही (America) ठणकावलं आहे. पाकिस्तानच्या बाबतीत अणवस्त्र दबाव चालणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. त्यानंतर, आज परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने पत्रकार परिषद घेत पुन्हा तीच री ओढण्यात आली आहे. काश्मिरच्या (Jammu kashmir) मुद्द्यावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही, असे म्हणत परराष्ट्र खात्याने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. पीओकेवर भारताची भूमिका स्पष्ट आहे, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola