ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 13 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 13 May 2025

पंतप्रधान मोदींचा सैन्याच्या शौर्याला सलाम.. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, थांबलं नसल्याचं जाहीर... पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर निर्णायक हल्ला होईल, मोदींचा इशारा

अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं...दहशतवाद, व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही.. पाकिस्तानसोबत चर्चा केवळ पीओकेवरच, मोदींची स्पष्टोक्ती

भारत पाकिस्तानच्या DGMO ची हॉटलाईनवर चर्चा, सीमेवर एकही गोळी चालणार नाही यावर एकमत, दोन्ही बाजूंच्या फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांची संख्याही कमी करणार

भाजपची आजपासून २३ मेपर्यंत तिरंगा यात्रा, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात रॅली, वरिष्ठ नेते सहभागी होणार

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार.... अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. 

एकत्र येण्याच्या चर्चांनंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही, टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola