Pandharpur Tulsi Vrundavan : वन विभागाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे, विठ्ठल मुर्तींचं अस्तित्व धोक्यात
abp majha web team
Updated at:
03 May 2023 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०१९ साली पंढरपुरात वनविभागानं एक वृंदावन उभं केलं.. त्याच तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं, पण, काही महिन्यातच हे वृंदावन वादात अकडण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणंच आकर्षण वाढतं असतानाच, इथल्या काही मंदिरांमध्ये पडझड झाली वन विभागाच्या तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांच्या मंदिरं कोसळल्याने इतर मंदिरं आणि 23 फुट उंचीच्या विट्ठल मूर्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय.. 6 कोटी रुपये खर्चून श्री यंत्राच्या आकारात उभारलेल्या या तुळशी वृंदावनाला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. आता येथील मंदिरांची पडझड झाल्याने वनमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेेत.