Sanjay Raut PC | मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार : संजय राऊत

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यभर संपूर्ण मंत्रिमंडळ फिरतंय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवर बसून कामाची व्याप्ती वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola