Ramdas Athawale | सर्व धार्मिक स्थळं खुली करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  लॉकडाऊन करण्यात आलं. त्यात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली. आता कोरोनाच्या प्रादुर्भावावर हळूहळू नियंत्रण मिळवलं जात असल्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक केलं जात आहे. त्यात आता भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च,  गुरुद्वार, बुद्धविहार, देरासर खुली करावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola