Milk Rates Protest | दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी आक्रमक, 27 ऑगस्टला बारामतीत मोर्चा काढणार
राजू शेट्टी हे दूध दरवाढीसाठी 27 ऑगस्ट रोजी बारामतीत मोर्चा काढणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवारांसोबत लंच डिप्लोमसीनंतर राजू शेट्टी हे पवारांना शह देणे थांबवतील असे वाटत असताना त्यांनी शरद पवारांच्या बारामतीतच मोर्चा काढून पवारांची गोची करण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी हे वेगवेगळ्या जिल्ह्यात दूध दरवाढी साठी आंदोलन करत आहेत.
Tags :
Dairy Development Milk Rates Milk Rates Constant Lockdown Milk Rates Milk Industry Milk Producers Milk Production Raju Shetty Raju Shetti