Pune : बैलगाडा शर्यत रद्द झाल्याबद्दल शिवाजीराव आढळराव पाटलांच्या महाविकास आघाडा सरकारवर घणाघात
Continues below advertisement
पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement