Pune Metro : पुणेकरांचा मेट्रोचा प्रवास सुरु, पहिल्या दिवशी 22 हजार पुणेकरांचा प्रवास
Pune Metro : मोठ्या दिमाखात पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे.