Stock Market Crash : शेअर मार्केटला रशिया-युक्रेन युद्धाची झळ, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला
Stock Market Crash : रशिया-युक्रेन युद्धाची झळ शेअर बाजाराला बसू लागली आहे. आज, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने गुंतवणूकदार होरपळले आहेत. शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत आहेत.