CoronaVirus | कोरोनाच्या संकटात 'जीवघेणी गर्दी'! खरेदी करताना 'कोरोना' विकत घेऊ नका!
सध्या दिवाळीच्या या आनंदाच्या वातावरणात दर दिवशी प्रसारमाध्यमात बातम्या येत आहे, कोरोनाच्या सावटाखाली असलेली यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करा. कारण कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्वतयारी देखील करुन ठेवण्याचे आदेश राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत. दिवाळी सणानिमित्त खरेदीकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.