Special Report | व्वा, सरपंच हवा तर असा... सरपंच पेरेंकडून पाटोदावासियांची दिवाळी गोड!
औरंगाबाद पासून जवळ असलेलं आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी कोविडच्या संकटात असलेल्या गावकऱ्यांची दिवाळी गोड कळवण्यात ठरवलं.. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटातही ग्रामपंचायतचा 100% कर भरला..त्यातून ग्रामपंचायतींना सवलतीच्या दरात 25 किलो साखर देण्याचा निर्णय घेतला.बाजारात 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर वीस रुपयात मिळाली आणि तेही 25 किलो. मग काय गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायलाच नको.