Dagdusheth Halwai Ganpati : सियाचिनमध्येही दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होणार

Continues below advertisement

 काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब भागातील सीमांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्येही दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. सियाचीनमधील सर्वधर्म प्रार्थनास्थळात प्रतिष्ठापनेसाठी बाप्पाची मूर्ती मराठा बटालियनच्या जवानांकडे सुपूर्द करण्यात आली. दोन फुटांची ही मूर्ती पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली आहे... मराठा बटालियननं ट्रस्टला पत्र लिहून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ट्रस्टनं त्यांच्या विनंतीला मान देत ही मूर्ती बनवून दिली आहे. यापूर्वी काश्मीरमधील गुरेज, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram