Baramati Ajit Pawar on Dutta Bharne : दत्तामामांच्या शिवीगाळ प्रकरणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया

Datta Bharne On Viral Video : इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत आमदार भरणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा (Baramati Agro) कुणीही येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. याबाबत एबीपी माझानं दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया जाणून घेतली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola