Ghotawade Phata Pune Fire : आगीत कंपनी जळून खाक, 18 जणांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola