Vishwajeet Kadam On Sanjay Raut : आम्हाला कुणीही इशारा देऊ नये, काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत : कदम
सलमान शेख
Updated at:
06 Apr 2024 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली : सांगलीच्या जागेसाठी कोणी आग्रही भूमिका घेतली, कोणी घेतली नाही यावर मी बोलणार नाही. सांगलीची (Sangli Loksabha) जागा परंपरेनं काँग्रेसची आहे, आमचं मजबुत संघटन असून ती जागा लढण्यास आम्ही सक्षम असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam on Sangli) यांनी नागपुरात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. सांगलीच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेसकडून दावा सुरुच असल्याने तिढा सुटलेला नाही. आज महाराष्ट्राचे प्रभारी यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. काँग्रेस पक्ष आम्हाला जे सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.