Vijay Wadettiwar : नंदुरबारची जागा हारत असल्याने आमची माणसं फोडतायेत वडेट्टीवारांची भाजपवर टीका

Continues below advertisement

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये (Nandurbar) दाखल झाली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे 13 मार्चला म्हणजेच उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं आहे. त्यावर आता काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले वडेट्टीवार पाहा व्हिडिओ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram