Vasant More Resign MNS : वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र! राजीनाम्यांतर दिली पहिली प्रतिक्रिया

पुणे : मनसेत माझा सतत अपमान झाला. मला लोकसभेची निवडणूक लढायची आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मनसे नकारात्मक आहे, असं म्हणत मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी मनसेच्या सगळ्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले होते. माझी नाराजी राज ठाकरेंवर नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावेळी बोलताना वसंत मोरेंनी 2006 चा किस्सा सांगितला. राज ठाकरेंनी   (Raj Thackeray) ज्यावेळी शिवसेना सोडली होती. त्यावेळी मी देखील शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला होता, असं ते म्हणाले. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola