Uddhav Thackeray On MVA : विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढणार, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray On MVA : विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढणार, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांना पूर्णविराम देतानाच आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने आणि सर्व घटकांना सामावून घेत लढणार असण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभेला एकत्रित दिसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषद बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूक आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा केली. आजची झालेली बैठक त्या अनुषंगाने झालेली पहिली बैठक होती, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रचाराचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मग शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यामुळे या दोन नेत्यांना महत्व देते एक प्रकारे महाविकास आघाडीच्या विजयातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.