Sanjay Raut | एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत | ABP Majha

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए घटक पक्षाची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शिवसेना जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एनडीए बैठकीचा निमंत्रण शिवसेनेला आलेलं नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही. त्यामुळे आता एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola