Sanajay Raut FULL: मुख्यमंत्र्यांची ताकद पाचपखाडी -वागळे इस्टेट बंद करण्या इतकीच,राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut: महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aaghadi) आयोजित करण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी घातलेल्या अटींवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मोर्चा जात असताना आमच्यावरच अटी लादल्या जात आहे. भाषणात अमुक शब्द वापरू नये, असे बंधन घालण्यात आले आहे. या अटींपेक्षाच या सरकारने आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. आज होणारा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Tags :
BJP Thackeray Vs Shinde MVA Morcha Morcha In Mumbai Mumbai Morcha Today Morcha In Mumbai Today Mumbai Morcha News Today Morcha In Mumbai Today Live