Raj Thackeray vs Maratha Aandolan : माझ्याशी बोलायचंय? घोषणा बंद करा आणि वर या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray, धाराशिव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले आहेत. त्यांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडलाय. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे, या दौऱ्यासाठी ते धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी "मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशी घोषणाबाजी देखील केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला
राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आहेत. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची रितसर वेळ मागितली होती. वेळ मागितल्यानंतर राज ठाकरेंनी वेळ नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडालेला आहे. मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.