Padmakar Valvi : नंदुबारमध्ये राहुल गांधी येताच काँग्रेसला मोठा धक्का; पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये (Nandurbar) दाखल झाली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे 13 मार्चला म्हणजेच उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं आहे.