Mumbai Pravin Darekar : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा नाही.
Continues below advertisement
Mumbai Pravin Darekar : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. मुंबई बँकेवर निवडून येताना प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणात मुंबईत दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.... विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे यादी दिलीय. त्यात प्रवीण दरेकर यांचं पहिलं नाव होतं, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
Continues below advertisement