Mumbai Coastal road : कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनीटांत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCoastal Road Inaugurated Today: मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai News) आज अतिशय महत्त्वाचा दिवस. याचं कारण म्हणजे, वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचं (Coastal Road) आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला (Bandra Worli See Link) देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे. दरम्यान, आजच्या उद्गाटन सोहळ्याचं निमंत्रण वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Worli MLA Aditya Thackeray) आणि खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना देखील देण्यात आलं आहे.