Mallikarjun Kharge News : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगेंचा विजय
Continues below advertisement
Mallikarjun Kharge News : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा दणदणीत विजय झालाय. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर थरूर यांना १ हजार ७२ मते मिळालीत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजार ३८५ जणांनी मतदान केले होते. जवळपास २५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्याशिवाय, यंदा २५ वर्षानंतर गांधी कुटुंबीयाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress President Shashi Tharoor Mallikarjun Kharge Rahul Gandhi COngress Mallikarjun Kharge Congress Mallikarjun Kharge News Mallikarjun Kharge Family Mallikarjuna Kharge