Anandraj Ambedkar Amravati Loksabha: अमरावती लोकसभा जागेवरून मविआचा नवा राजकीय डाव?

Continues below advertisement

'महाविकास आघाडी' अमरावतीच्या जागेवरून मोठा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहे. 'महाविकास आघाडी' दुसरा 'आंबेडकर' गळाला लावण्याच्या प्रयत्नात असून अमरावती लोकसभेसाठी मविआच्या आनंदराज आंबेडकरांना मैदानात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आनंदराज आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे सख्खे लहान बंधू आहे. आनंदराज आंबेडकरही अमरावती लोकसभा लढण्यासाठी इच्छूक आहेत. आनंदराज आंबेडकरांचा स्वत:चा 'रिपब्लिकन सेना' हा पक्ष आहे. मविआतील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्याचा आनंदराज आंबेडकरांना प्रस्ताव. देण्यात आल्याची माहितीये. आनंदराज आंबेडकरांशी अनिल देशमुखांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram