Maharashtra Political Crisis : दादागट आणि पवारांच्या भेटीमुळे मविआत अस्वस्थता ? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 09:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवारांसोबत ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. त्यानंतर काल अधिवेशनापूर्वी हीच अस्वस्थता दिसून आली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही नेता दिसून आला नाही. तर एकीकडे अजित पवार गट हा शरद पवारांची मनधरणी करण्याच्या हेतूने त्यांची भेट घेतायत. तर दुसरीकडे सत्ताधारी शरद पवार यांनी अजित पवार गटाचा विचार करून त्यांच्या निर्णयासोबत जाण्याचा विचार केल्यास स्वागत केलं जाईल असं म्हणतायेत. त्यामुळे याआधी पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत ही अस्वस्थता वाढ राहण्याची शक्यता आहे.