Lok Sabha 2024 :  देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं! 7 टप्प्यात होणार निवडणुका

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे. 24 जून रोजी मुदत संपत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजीव कुमार पुढे म्हणाले की, “आमच्याकडे 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, जे काही खंडांच्या एकत्रित मतदारांपेक्षा जास्त आहेत. 10.5 लाख मतदान केंद्रे, 1.5 कोटी मतदान अधिकारी, सुरक्षा अधिकारी. 55 लाखांहून अधिक ईव्हीएम, 4 लाख वाहने असतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram