Raju Shetty : हातकणंगलेतून उमेदवारी न देता मला बाहेरुन पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetty : हातकणंगलेतून उमेदवारी न देता मला बाहेरुन पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाविकास आघाडीने हातकणंगले मधून उमेदवार देऊ नये तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठेवला मविआ समोर प्रस्ताव. महाविकास आघाडीमध्ये येण्यास किंवा मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास शेट्टींचा नकार. मी महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही हे 100% खरा आहे...महाविकास आघाडी मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. हातकणंगले मध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष आणि इतर अशी लढाई सुरू आहे.हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे ही जागा आली असं मी ऐकल. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा, मी ती जागा सहज जिंकू शकतो या संदर्भात मी उद्धव ठाकरे सोबत चर्चा केली. मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मला आला होता, पण मी म्हटलं मागील 25 वर्ष मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा माझा विचार नसल्याचा मी त्यांना सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. माझ्या प्रस्तावावर विचार लवकरच करू असं त्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील काही धोरणावर मला आक्षेप आहे, 2022 मध्ये मी आघाडी सोडली आहे शेतकऱ्यांच्या विरोधात जेव्हा धोरण आखली जातात तेव्हा आम्ही त्याचा समर्थन करणार नाही. आमचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल नाही शेतकऱ्यांबाबतची त्यांची भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही सहा जागा लढवण्याची तयारी केलेली आहे. तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर सोडलेला आहेजर आम्हाला महाविकासाकडील बाहेरून पाठिंबा दिला तर किती जागा लढवायच्या किंवा कोणत्या पक्षाला मदत करायची ते त्यावेळी आम्ही ठरवू