Exit Polls 2023 : एबीपी माझा आणि सी-वोटरचा एक्झिट पोल, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर
Keshav Upadhyay Vs Atul Londhe Exit Polls 2023 : एबीपी माझा आणि सी-वोटरचा एक्झिट पोल, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर
ABP Cvoter Exit Poll Result : लोकसभेची मिनी फायनल समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. इंडिया टुडे, माय अॅक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला 106-116, काँग्रेसला 111-121 आणि इतरांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात 230 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 116 जागांची गरज आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. तेथील मतांची टक्केवारी 76.31 टक्के होती. जी 2018 च्या तुलनेत (76.88) किरकोळ कमी होती. याठिकाणी पहिल्या टप्प्यात 20 जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या निकालापूर्वी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत, त्यापैकी 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा आहे.