Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP Majha

Continues below advertisement

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र, राज्यात नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांची भुमिका मांडणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. ते नेमकी काय भुमिका मांडणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष 

गेल्या तीन दिवसांसून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 3 दिवसानंतर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणत्या ऑफर आल्या, कोणत्या ऑफर नाकारल्या, मुख्यमंत्री पदाबाबत नाराजी की नाराजी दूर, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात मिळणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram