Chandrakant Patil PC | पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : चंद्रकांत पाटील | ABP Majha
Continues below advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. त्या कायम भाजपसोबतच राहणार आहेत, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत या अफवा आणि बातम्या थांबवाव्यात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र त्यामुळे पंकजा भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Continues below advertisement